

Mhada Expensive House Price Hike
ESakal
मुंबई : कोट्यवधीच्या किमती असल्याने आधीच धूळखात पडलेल्या म्हाडाच्या महागड्या घरांच्या किमतीत आणखी भर पडणार आहे. एप्रिलपासून रेडीरेकनर दरात वाढ झाली आहे. तसेच सदरची घरे गेल्या चार-पाच वर्षांपासून तयार असल्याने त्यांच्या मेंटेनन्सच्या मूळ किमतीत भर पडणार असल्याने आधीच महागड्या असलेल्या घरांच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे ही घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीस काढल्यास मुंबईकर त्याला कितपत प्रतिसाद देणार, असा प्रश्न उभा राहणार आहे.