
Mhada
मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या आराखड्यावरील पुनर्विकास प्रकल्पांना आता वेग येणार आहे. आतापर्यंत एखाद्या विकसकाला, संस्थेला म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत विनियम ३३ (५) अंतर्गत अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळासाठी परवानगी हवी असेल तर त्यासाठीचे अधिमूल्य (प्रीमियम) म्हाडाकडे चार हप्त्यांमध्ये भरणे बंधनकारक होते; मात्र पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळावी, म्हणून म्हाडाने आता प्रिमियम पाच-सहा हप्त्यांमध्ये भरता येईल, अशी व्यवस्था केली आहे. त्यासाठी म्हाडाने आपल्या जुन्या ठरावात सुधारणा केल्याने विकसकांना दिलासा मिळणार असून पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळणार आहे.