
Mhada House
ESakal
मुंबई : मुंबईत हक्काचं घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र सातत्याने घरांच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य लोक म्हाडाकडून (MHADA) निघणाऱ्या घरांच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असतात. म्हाडाकडून जारी केलेल्या प्रत्येक लॉटरीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. हजारो घरांच्या सोडतीसाठी लाखो अर्ज केले जातात. मात्र काही प्रसंगी म्हाडाच्या घरांच्या सोडती या अपवाद ठरत असल्याचे दिसून येते.