
मुंबई : म्हाडाची कोकण मंडळास राज्यभरात अनेक ठिकाणी घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामध्ये जवळपास अडीच-तीन हजार कोटी रुपयांचा निधी अडकून पडला आहे. त्यामुळे भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये म्हाडा आता मागणी असेल तरच घरे बांधणार आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी घरे बांधायची आहेत, तेथील मागणी कशी आहे याचा सुरुवातीलाच अभ्यास करून मगच गरजेनुसार घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्याची सुरुवात पुणे आणि नाशिक मंडळाकडून केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात घरे पडून राहण्याचा धोका कमी होऊ शकणार आहे.