
Mhada
मुंबई : मुंबईत घरांचे तसेच दुकानाच्या गाळ्यांचे किमती वाढत असल्याचे पाहता अनेकजण म्हाडाचे घर आणि गाळ्यांच्या सोडतीच्या प्रतीक्षेत असतात. नुकतेच म्हाडाने १४९ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी सोडत जारी केली होती. यासाठी दिवसेंदिवस अर्जदारांचा वाढत ओघ पाहता म्हाडाने अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ केली आहे.