म्हाडाची "मिनी' सोडत लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

चेंबूरमधील सहकारनगर आणि पवईतील तुंगा येथील म्हाडा सदनिकांच्या सोडतीसाठी अर्जदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या 217 सदनिकांची "मिनी' सोडत 21 एप्रिलला काढली जाणार होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत 2 जूनपर्यंत लांबणीवर पडली आहे.

मुंबई - चेंबूरमधील सहकारनगर आणि पवईतील तुंगा येथील म्हाडा सदनिकांच्या सोडतीसाठी अर्जदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या 217 सदनिकांची "मिनी' सोडत 21 एप्रिलला काढली जाणार होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत 2 जूनपर्यंत लांबणीवर पडली आहे. पवईतील तुंगा येथे उच्च उत्पन्न गटासाठी म्हाडाच्या 46 सदनिका असून, चेंबूरमधील सहकारनगर येथील शेल टॉवरमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी उर्वरित सदनिका आहेत. या सदनिकांच्या सोडतीसाठी 7 मार्चपासून नोंदणी सुरू झाली होती. आतापर्यंत 36 हजार 901 अर्ज दाखल झाले आहेत. या घरांच्या सोडतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदतही वाढविण्यात आली आहे.
Web Title: Mhada Home Mini Draw