
मुंबई : भविष्यात म्हाडाच्या घरांच्या किंमती आठ-दहा टक्क्यांनी घटणार आहे. सामान्यांना परवडणा-या दरात घरे उपलब्ध व्हावीत म्हणून म्हाडा सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र घरांच्या किंमती निश्चित करताना रेडीरेकनर दराशिवाय विचारात घेतला जाणारा प्रशासकीय खर्च, बांधकाम साहित्याच्या किंमतीमधील वाढ, गुंतवणूकीवरील व्याज आदी बाबी गृहित धरल्या जात असल्याने किंमती फुगत आहेत. त्यामुळे रेडिरेकनर दराशिवाय प्रत्यक्षात जो खर्च होईल त्याचाच किंमत निश्चित करताना करावा अन्य वाढीव खर्च गृहित धरू नये, अशी भूमिका घरांच्या किंमती निश्चित करण्यासाठीच्या सुत्रांची पुनर्रचना करण्याकरिता नेमलेल्या अभ्यास समितीने घेतली आहे. त्याबाबतचा समितीचा अहवाल म्हाडा प्राधिकरणाला लवकरच सादर केला जाणार आहे.