Mhada Rented House:
Esakal
बापू सुळे
मुंबई : मुंबईतील आठ दहा दशके जुन्या असलेल्या उपकरप्राप्त (सेप्स) इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मोहीम म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने उघडली आहे. १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत १,७१७ इमारतींचे ऑडिट पूर्ण झाले. त्यापैकी तब्बल १७८ इमारती अतिधोकादायक, तर ३३३ इमारती धोकादायक ठरल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे मोठे आव्हान म्हाडासमोर असणार आहे.