
Mhada
मुंबई : शहरात घरांच्या वाढत्या किंमती पाहता सर्वसामान्य नागरिकांसह अनेकजण म्हाडाकडून निघणाऱ्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा करत असतात. काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या कोकण मंडळाने ५,३५४ घरांच्या विक्रीसाठी लाॅटरी जाहीर केली होती. या लॉटरीला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर या लॉटरीमध्ये सानपाडा येथील २ घरांचा समावेश असून यासाठी तब्बल ६ हजाराहून अधिक अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे.