
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील ५२५७ घरांच्या विक्रीसाठी लाॅटरी काढली जाणार आहे. त्यासाठी म्हाडाकडे इच्छुकांच्या ऑनलाईन अर्जाचं पाऊस पडत आहे. दररोज हजारो अर्ज पोर्टलवर येत असून आतापर्यंत आलेल्या एकूण अर्जाची संख्या तब्बल ९८ हजार ७३० वर पोहोचली आहे. तर ६६ हजार ८६ जणांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज अंतिम केला आहे. तसेच अर्ज करण्यासाठी आणखी ९ दिवस आहेत. त्यामुळे म्हाडाच्या सव्वा पाच हजार घरांसाठी मोठी स्पर्धा निर्माण होणार असल्याचे दिसत आहे.