

Mhada Digital system
ESakal
मुंबई : राज्य सरकारच्या 'गव्हर्नन्स परफॉर्मन्स अॅण्ड रिफॉर्म' (जीपीआर २.०) या प्रशासकीय सुधारणा उपक्रमांतर्गत म्हाडाच्या 'सीएफसी @ होम' आणि 'व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम' या दोन डिजिटल प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या नागरिकाभिमुख संगणकीय प्रणालींचे अनावरण करण्यात आले.