

Mhada
ESakal
मुंबई : मुंबईकरांच्या गृह स्वप्नपूर्तीला म्हाडाचे बळ मिळाले असून, तब्बल दोन हजार ६४० जणांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात मोठ्या उत्साहात लॉटरीची सोडत आज काढण्यात आली. या वेळी सुरुवातीला उपस्थित अर्जदारांच्या चेहऱ्यांवर चिंता आणि उत्कंठा होती. सोडतीची प्रक्रिया सुरू होताच अनेकांच्या मोबाईलवर विजेते ठरल्याचे संदेश येताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.