
Mhada
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाने धारावीत उभारलेल्या पाच इमारती धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) माध्यमातून अदाणीच्या कंपनीला दिल्या जाणार आहेत. त्या मोबदल्यात म्हाडाने सुमारे ६४२ कोटींची मागणी केली होती; मात्र अदाणींकडून म्हाडाला नुकतेच ४०३ कोटी रुपये वळते केले आहेत. त्यामुळे म्हाडाने मागणी केलेली उर्वरित रक्कम कधी मिळणार, अशी चर्चा म्हाडा कार्यालयात सुरू आहे.