Mhada Lottey : म्हाडाची लॉटरी रखडली, सोडत लांबल्याने अर्जदारांची आर्थिक ओढाताण

Mhada Housing Lottery: म्हाडा मुंबई मंडळाने २,६४० घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. मात्र या लॉटरीची सोडत लांबल्याने अर्जदारांची आर्थिक ओढाताण सुरू झाल्याची माहिती आहे.
Mhada

Mhada

ESakal

Updated on

बापू सुळे

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,६४० घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीची सोडत लांबल्याने सर्वसामान्य अर्जदारांची आर्थिक ओढाताण सुरू झाली आहे. म्हाडाच्या सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार १५ मे रोजी लॉटरीची सोडत निघणार होती; मात्र अल्प प्रतिसादामुळे अर्ज करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अचारसंहितेमुळे लॉटरी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे अनामत रक्कम भरण्यासाठी उसनवारीने पैशांची जमवाजमव केलेल्या सामान्यांचे हजारो रुपये अडकून पडल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. परिणामी, लॉटरीची सोडत कधी निघणार, असा सवाल अर्जदारांकडून केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com