

MHADA
ESakal
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरू तेग बहादूर नगर (जी. टी. बी.नगर) समूह पुनर्विकास प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेणार आहे. खासगी जमिनीवरील सी अँड डी मॉडेलअंतर्गत राबविण्यात येणारा म्हाडाचा पहिला प्रकल्प असून त्याच्या प्रारूप बृहत आराखड्याचे आज वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांना सादरीकरण करण्यात आले.