Mhada House Draw : म्हाडा मुंबई मंडळ सोडतीची तारीख ठरेना

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाने जारी केलेल्या ४०८२ सदनिकांच्या सोडतीच्या तारखेबाबत अद्यापही गुप्तता पाळण्यात येत आहे.
Mhada-Home
Mhada-Homesakal

मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाने जारी केलेल्या ४०८२ सदनिकांच्या सोडतीच्या तारखेबाबत अद्यापही गुप्तता पाळण्यात येत आहे. म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोडत प्रक्रियेत सुरु असलेले पावसाळी अधिवेशन हा सर्वात मोठा अडसर ठरत आहे.

यासोबतच, सोडतीसाठी मंत्र्यांच्या वेळ मिळत नसल्याने आणि म्हाडाचे अधिकारी अधिवेशनात व्यस्त असल्यानेही सोडतीची तारीख निश्चित होत नसल्याचे म्हाडातून कळते आहे. त्यामुळे आता मुंबई मंडळाच्या अर्जाची प्रक्रिया संपली असली तरी सोडतीची तारीख अद्याप ठरलेली नाही.

दरम्यान, सोडत प्रक्रियेत अनामत रक्कमेचा भरणा केलेल्या १,२२,२३५ अर्जांचा समावेश आहे, यापैकी ५२७ अर्ज अपात्र ठरले आहेत तर १४,९९० अर्जांची तपासणी सुरू आहे. अशाप्रकारे अद्यापपर्यंत १,०६,७९९ स्वीकृत अर्ज संगणकीय सोडतीत सहभाग घेणार आहेत.

मात्र अदयाप प्राप्त अर्जाच्या पडताळणी, हरकती दावे नोंदविणे या प्रक्रिया सुरु असून सोडतीची तारीख गुलदस्त्यातच आहे. यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकारमध्ये गदारोळ झाला आणि मंत्री त्यात व्यस्त होते. तर आता पावसाळी अधिवेशनही सुरू झाले असून, त्यात नेतेमंडळी आणि म्हाडाचे अधिकारीही सध्या व्यस्त आहेत.

पावसाळी अधिवेशन पूर्ण २ आठवडे चालणार आहे. हे अधिवेशन ४ ऑगस्टला संपणार असून तोपर्यंत सर्व नेते मंडळी आणि अधिकारी यांचे वेळापत्रक व्यस्त असल्याने लॉटरीच्या सोडतीची तारीख निश्चित करण्यात अधिकाऱ्यांना अडचणी येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com