
Mumbai: मुंबई महानगर क्षेत्रात म्हाडा तब्बल आठ लाख घरे उभारणार आहे. देशाची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डाॅलर करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी देशात चार ग्लोबल इकाॅनाॅमिक हब (ग्रोथ हब) उभारली जाणार असून त्यापैकी एक एमएमआर क्षेत्रात असणार आहे.
त्यामुळे येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी म्हाडा तब्बल आठ लाख घरे उभारणार आहे. त्यासाठी नीती आयोगाच्या मदतीने म्हाडाची जोरदार तयारी सुरू आहे.