म्हाडा शिवसेनेला; सिडको भाजपला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागताच महामंडळांतील नियुक्‍त्यांचा भाजप-शिवसेनेतील तिढा सोडवण्यात आला आहे.

सर्वांत कळीचा मुद्दा असलेली मुंबईतील दोन महामंडळे भाजप-शिवसेनेने वाटून घेतली आहेत. म्हाडा शिवसेनेला; तर सिडको भाजपच्या वाट्याला
आले आहे.

उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ शिवसेनेला मिळणार असून, विदर्भ विकास महामंडळासह इतर विकास महामंडळे भाजपला दिली जाणार आहेत. महामंडळांमधील नियुक्‍त्यांवरून भाजप आणि शिवसेना दोघेही हक्क सांगत असल्याने साडेतीन वर्षांपासून नियुक्‍त्या लांबणीवर पडल्या होत्या. राज्यात सत्ता आल्यानंतर महामंडळे किंवा अन्य समित्यांवर आपली नियुक्ती होईल, या आशेवर दोन्ही पक्षांतील तालुका पातळीपर्यंतचे कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून होते. मात्र, महामंडळेच काय, जिल्हा आणि तालुका पातळीवरील समित्याही अद्याप अनेक जिल्ह्यांत झाल्या नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.

महामंडळांच्या नियुक्‍त्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खासदार अनिल देसाई या चौघांची समिती दोन्ही पक्षांकडून नियुक्त करण्यात आली होती. महत्त्वाचे म्हाडा मंडळ शिवसेनेकडे आणि सिडको भाजपकडे देण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

Web Title: mhada shivsena cidco bjp politics