म्हाडाच्या कंत्राटदारासह पर्यवेक्षकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - मुंबईतील गजबजलेल्या झवेरी बाजारातील म्हाडाच्या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या चौघांच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदार आणि पर्यवेक्षकाला अखेर पोलिसांनी आज अटक केली आहे. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 15 डिसेंबरला ही दुर्घटना घडली होती. 

झवेरी बाजार येथे म्हाडाच्या 50/52 सीपी या पाच मजली इमारतीचे काम सुरू होते. या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत फिरोज खान (वय 23), सपाई शेख (24), रॉकी शेख (19) आणि बरकतउल्ला खान (50) यांचा मृत्यू झाला होता. इमारतीचे काम म्हाडाने मे. चौहान कॉर्पोरेशन या कंपनीला दिले होते. कंत्राटदार इमरान शरीफ खान (30) याने या कामासाठी पर्यवेक्षक म्हणून तरुण रॉय (48) याला नेमले होते. या दोघांनाही लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी आज अटक केली. 

Web Title: MHADA the supervisor was arrested