Mhada Rented House:
Esakal
मुंबई : शहरात स्वतःच्या हक्काच्या घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र महागाईमुळे घरांच्या वाढत्या किमतींमुळे घरं घेणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हाडाकडून निघणाऱ्या लोटरींच्या प्रतीक्षेत असतात. म्हाडाकडून निघणाऱ्या प्रत्येक लॉटरीला मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र म्हाडाच्या विविध मंडळांच्या सोडतीमधील शेकडो रिक्त घरे विक्रीविना पडून राहिली आहेत. याबाबत म्हाडा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.