

Redevelopment projects
ESakal
मुंबई : ‘म्हाडा’तर्फे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करत असून विविध पुनर्विकास प्रकल्पांतून नागरिकांना चांगली घरे केली जात आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प, जीटीबीनगर येथील पंजाबी काॅलनी, अभुदयनगर, जोगेश्वरीतील पूनमनगर अशा अनेक पुनर्विकास प्रकल्पांतून राज्याच्या गृहसाठ्यात सुमारे सहा लाख नवीन घरांची भर पडणार आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी साेमवारी दिली.