म्हसळा सात दिवस सूर्यदर्शनाविना

म्‍हसळाकरांना सात दिवस सूर्यदर्शन झाले नाही.
म्‍हसळाकरांना सात दिवस सूर्यदर्शन झाले नाही.

म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्‍यात ३० ऑगस्टपासून आजपर्यंत पावसाची संततधार सुरू आहे. आजपर्यंत ४२५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे (प्र) ता.कृ.अधिकारी ज्ञानदेव अनाप यांनी सांगितले. तालुक्‍याचे सरासरी पर्जन्यमानापेक्षा १३७ टक्‍के पाऊस झाल्याचे सांगण्यात आले, तर जिल्‍ह्याच्‍या पावसाची नोंद ४१३६.१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ३१४२.६४ मि.मी. असताना आजपर्यंत सरासरी पर्जन्यमान ४१३६.१६ मि.मी. झाले आहे. जिल्ह्यांत सर्वांत जास्त ६०३५ मि.मी. माथेरान येथे पर्जन्यमान झाले आहे. जिल्ह्यात ४ हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेल्‍या अन्य तालुक्‍यांमध्‍ये तळा ५०६४ मि.मी, पेण ४९३७.९० मि.मी, पोलादपूर ४७९२ मि.मी, माणगाव ४७४५.०५ मि.मी, रोहा ४६६६ मि.मी, म्हसळा ४२५२ मि.मी., खालापूर ४०७८ मि.मी., कर्जत ४०५१.७४ मि.मी. अशी पावसाची नोंद करण्‍यात आली आहेत. पावसाच्‍या संततधार सुरू असल्‍याने ४०० ते ५०० मिलिमीटर पावसाची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

दरम्‍यान, गेल्‍या सात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्‍याने म्‍हसळाकरांना सात दिवस झाले, तरी सूर्याचे दर्शन झाले नाही. त्‍यामुळे नागरिक गणेशोत्‍सवाचा उत्‍साह असतानाही पावसामुळे थोडे निरुत्‍साह असल्‍याचे दिसत आहेत.

तालुक्‍यात मागील काही दिवसांत नैसर्गिक आपत्ती आली नाही. नैसर्गिक आपत्तीची ५८ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. त्यांना २ लाख ४९ हजार ५४८ अनुदान आणि खरसई धरणात गुराख्याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी ४ लाख अनुदान देण्यात आले आहे.
- के. टी. भिंगारे, नायब तहसीलदार, म्हसळा 

म्हसळा तालुक्‍यात व जिल्ह्यांत सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असताना तालुका व जिल्हा प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था यांनी वाड्या, पाडे, शहर, तालुका स्तरावर येत असलेल्या पाणी टंचाईवर प्रभावी मात करण्यासाठी उपाय योजनांबाबत नियोजन करणे आवश्‍यक आहे.
- ॲड. खलील डीमटिमकर, सामाजिक कार्यकर्ते, म्हसळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com