‘एमएचटी-सीईटी’ ऑनलाईन

Online Exam
Online Exam

मुंबई - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी ही सामाईक प्रवेश परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे. सीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी सीईटी सेलने विद्यार्थी, पालक, शिक्षकतज्ज्ञांकडून सूचना मागविल्या होत्या. मे महिन्यात होणारी ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने तयारी सुरू केली आहे. 

राज्यातील वैद्यकीय, व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतात; मात्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होतात. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांची संख्या लाखोंच्या घरात असल्याने ऑफलाईन परीक्षेचे नियोजन करणे, प्रश्‍नपत्रिका वेळेत आणि सुरक्षितरीत्या परीक्षा केंद्रांवर पोचवणे, निकाल जाहीर करणे यासाठी अथक मेहनत घ्यावी लागत असे. ही परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी काही महिन्यांपासून सीईटी सेलमार्फत चाचपणी सुरू होती. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी तीन ते चार लाख विद्यार्थी परीक्षा देत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांसोबत चर्चा सुरू झाली आहे. ऑनलाईन परीक्षेमुळे ही परीक्षा अधिक पारदर्शक आणि निकाल वेळेत लागण्यास मदत होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

पुढील वर्षी होणारी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेशाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे सीईटी सेलने ठरवले आहे. त्यानुसार परीक्षेची तयारी करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. 
- डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com