Water Line : एमआयडीसीची काटई येथे जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

कल्याण शिळफाटा रोडवरील काटई गाव हद्दीत गुरुवारी मध्यरात्री एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
Waterline Leakage
Waterline LeakageSakal

डोंबिवली - कल्याण शिळफाटा रोडवरील काटई गाव हद्दीत गुरुवारी मध्यरात्री एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर आल्याने सुमारे अर्धा ते एक तास शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. एमआयडीसीची जलवाहिनी फुटण्याची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. मागील वर्षी सहा वेळा एमआयडीसीची जलवाहिनी फुटली होती.

गुरुवारी रात्री काटई गावातील दुर्गा माता मंदिरासमोरील एमआयडीसी ची जलवाहिनी अचानक वॉल जवळ फुटली. अति उच्च दाबाने जलवाहिनीतून पाणी बाहेर येऊ लागल्याने जलवाहिनी शेजारील रहिवासी घाबरले.

काही रहिवाशांच्या घरात जलवाहिनीचे पाणी घुसले. शिळफाटा रस्त्यावरील दुतर्फाची वाहतूक ठप्प झाली. जलवाहिनीच्या वरील भागातून उच्च दाबाच्या वीज वाहिन्या गेल्याने पाण्याचा संपर्क येऊन धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती.

स्थानिक रहिवाशांनी तातडीने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना कळवले. एमआयडीसीचे अभियंते आणि दुरुस्ती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जलवाहिनीचा बारवी धरणाकडून येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जलवाहिनीतील आणि रस्त्यावरील पाणी ओसरल्यानंतर अभियंत्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले. शुक्रवारी दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com