esakal | भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंच्या मागे पुन्हा ईडी, आज होणार चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंच्या मागे पुन्हा ईडी, आज होणार चौकशी

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी होणार आहे.

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंच्या मागे पुन्हा ईडी, आज होणार चौकशी

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी होणार आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे. गेल्या महिन्यात ३० डिसेंबरला ईडीकडून एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र खडेस यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ईडीची चौकशी लांबणीवर पडली होती. 

एकनाथ खडसे गेल्या 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर होणार होते.  कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना क्वारंटाईन व्हावं लागतं होतं. अखेर आज त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपणार असल्याने त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

आज सकाळी 11 वाजता खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.  पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे. 

हेही वाचा- धनंजय मुंडेंना मोठा दिलासा

खडसेंना जळगावात असताना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली होती. लक्षणे जाणवल्यानंतर त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. मुंबईतल्या निवासस्थानी 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर खडसेंनी आराम केला. मात्र कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. या चाचणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर खडसेंनी ईडीकडे चौकशीला हजर राहण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी मागितला होता. खडसेंनी ईडीकडे मागितलेला हा कालावधी संपला आहे.

MIDC land case ED summons Eknath Khadse join investigation today

loading image
go to top