esakal | एमआयडिसीची पाईपलाईन फुटली हजारो लिटर पाणी वाया !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

MIDC : पाईपलाईन फुटली हजारो लिटर पाणी वाया !

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण (Kalyan) शीळ (Shil) रोडवरील देसाई गावाजवळ एमआयडिसीची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सकाळी सव्वा 8 च्या सुमारास ही पाईपलाईन फुटली असून पाईपलाईनचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

यामुळे ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर व एमआयडिसीतील औद्योगिक विभागास होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

Mumbai

Mumbai

डोंबिवली नजीक कल्याण शीळ रोडवरील कोकण किंग हॉटेल जवळ एमआयडिसीची सुमारे 1800 मिमी व्यासाची पाईपलाईन फुटली आहे. यातून हजारो लिटर पाणी वाया जात असून आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले आहे. ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, एमआयडिसीतील औद्योगिक विभागास या लाईनवरून पाणी पुरवठा होतो. सध्या पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून पाण्याचा दाब कमी होताच बिघाड काय झाला हे पाहण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यात येईल.

यामध्ये किती कालावधी लागेल सांगता येत नसल्याचे एमआयडिसीतील अधिकृत सूत्रांनी सांगितले.

loading image
go to top