Ro-Ro Service
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - मध्य-पूर्व आशियातील युद्ध परिस्थितीचे पडसाद आता कोकणच्या महत्त्वाकांक्षी मुंबई (भाऊचा धक्का) - विजयदुर्ग रोरो (रो-पॅक्स) फेरी सेवेलाही बसले असून तांत्रिक बिघाडानंतर दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा रखडल्याने या सेवेवर अक्षरशः ग्रहण लागले आहे. जहाजाच्या चार इंजिनांपैकी तीन इंजिन बंद पडल्याने सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.