मोफत फॉर्मची दहा रुपयांना विक्री; मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात ना ते हेच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परप्रांतीय नागरिक आतुर झालेले पहायला मिळत आहेत. परंतु नवी मुंबई मध्ये परप्रांतीय नागरिकांमध्ये संभ्रमाच वातावरण पहायला मिळतं आहे.

नवी मुंबई : आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परप्रांतीय नागरिक आतुर झालेले पहायला मिळत आहेत. परंतु नवी मुंबई मध्ये परप्रांतीय नागरिकांमध्ये संभ्रमाच वातावरण पहायला मिळतं आहे. महापालिका प्रशासनामार्फत या नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगण्यात येतंय तर पोलिस प्रशासन मनपाकडे पाठवतायत. महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवण्यात व्यस्त असून यामध्ये नवी मुंबईतील परप्रांतीय नागरिक भरडला जातोय.

धक्कादायक ! उपचारांनंतरही फुफ्फुसांमध्ये लपून राहतो कोरोना? काय सांगतायत वैज्ञानिक?

यासोबतच मोफत मिळणार फॉर्मची काही जण 10 रुपयांमध्ये विक्री करत आहेत. नागरिकांमध्ये फॉर्म कुठून घ्यायचा व तो कुठे भरायचा याबद्दल संभ्रमावस्था असून प्रशासन यामध्ये भर टाकत आहे. योग्य माहिती मिळत नसल्याने नागरिक विभाग कार्यालय व पोलिस स्टेशन मध्ये गर्दी करत असून यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झालीये. त्यामुळे आधीच लॉकडाऊन मुळे त्रस्त झालेल्या या कामगारांना आता प्रशासकीय निष्काळजीपणाचा देखील फटका बसताना दिसत आहे.

PF मधून पैसे काढणाचं प्रमाण वाढलं; अर्थतज्ज्ञ देतायत 'हा' महत्त्वाचा सल्ला... 

हेच फॉर्म  काही मेडिकल दुकानात ही उपलब्ध झाले तर काही जण रस्त्यावर पाच ते दहा रुपयाला फॉर्म विक्री करू लागले आहेत. त्यामुळे परप्रांतीयांनी आपल्या जवळच्या मेडिकल मधून दहा रुपये खर्चून फॉर्म खरेदी केले आहेत. याबबत नवी मुंबई पोलिसांनी सांगितले की फार्म कुठे ही जमा करू नका. पोलिस सगळीकडे जावून गल्लोगल्ली घोषणा केल्यानंतर फॉर्म जमा करा असे घणसोली पोलिसांनी सांगितले असल्याचे परप्रांतीयांनी सांगितले. तसेच भावे नाट्यगृहामध्ये देखील नागरिकांनी फॉर्म घेण्यासाठी गर्दी केली होती. त्या ठिकाणी हेच फॉर्म मोफत वाटण्यात आले पण काहींनी एका फिर्मच्य छ्यांकित प्रती काढून दहा रुपयाला विकल्याचे परप्रांतीय घनश्याम गुप्ता यांनी सांगितले.

migration details free form is sold for rs 10 in navi mumbai and most of the parts of state


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: migration details free form is sold for rs 10 in navi mumbai and most of the parts of state