स्थलांतरामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात कामगारांची चणचण; वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 24 May 2020

स्थलांतरितांनी गावाकडे जाण्यास सुरुवात झाल्यामुळे केवळ लोकवस्त्या ओस पडण्यास सुरुवात झालेली नाही तर मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातही कामगारांची उणीव प्रकर्षाने जाणवण्यास सुरुवात झाली आहे. 

मुंबई ः स्थलांतरितांनी गावाकडे जाण्यास सुरुवात झाल्यामुळे केवळ लोकवस्त्या ओस पडण्यास सुरुवात झालेली नाही तर मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातही कामगारांची उणीव प्रकर्षाने जाणवण्यास सुरुवात झाली आहे. 
आमच्या सुपर मार्केटमध्ये काम करणारे 35 कामगार गावाकडे गेले आहेत, अशी तक्रार कफ परेडमधील व्यापाऱ्यांनी केली. त्यांना नियमीत पगार मिळत होता, पण त्यांच्या गावाकडे चिंता वाठत होती. त्यामुळे त्यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला. ते काहीही ऐकण्यास तयार नव्हते. आता दुकान कसे चालवणार हा आमच्यासमोर प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले.
हिरे आणि सोने बाजारातील व्यापाऱ्यांची अवस्था वेगळी नाही.

मुंबईकरांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी; जाणून घ्या अधिक माहिती 

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. लॉकडाऊन संपल्यावर दुकाने उघडण्यास परवानगी दिली तरी कारागीर, कामगार आहेत कुठे अशी त्यांनी विचारणा केली. दुकानाची स्वच्छता करायची ठरवली तरी कामगार मिळत नाहीत असे त्यांनी सांगितले. 
नॉन रेड झोनमध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने ऊघडली आहेत. इदमुळे दुकानात विशेषतः कापड खरेदीसाठी गर्दीही होत आहे, पण पुरेसे कामगार नसल्याची तक्रार केली जात आहे. सुरक्षित अंतर राखण्यासाठी दुकानात सर्वच गिऱ्हाईकांना प्रवेश दिला जात नाही, त्याचबरोबर कामगार कमी असल्यामुळे ज्यांना प्रवेश देतो, त्यांनाही जास्त प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यांचे पुरेसे समाधान करता येत नाही, अशी दुकानदारांची तक्रार आहे. 
दुकानदारांना कामगार नाहीत, त्याचबरोबर आपला बिझनेस कसा होणार याचीही चिंता भेडसावत आहे. अनेक ठिकाणी पगार कपात होत आहे. अनेक कंपन्यात नोकर कपात होत आहे. नोकरीवर टांगती तलवार असताना कापड खरेदी किंवा जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी कशी होईल अशी विचारणा काही दुकानदार करीत आहेत. 

मोठी बातमी! मुंबईची लाइफलाईन टप्प्याटप्प्याने लवकरच सुरू होणार?

खरेदीचा प्रश्न दूर राहिला, उत्पादन किती प्रमाणात होईल, हा प्रश्न अनेक कंपन्यांना सतावत आहे. मुंबई परिसरातील अनेक उद्योगसमूहात किमान 80 टक्के कामगार परराज्यातील होते. ते आता निघून गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत काम कसे सुरु करणार हा प्रश्न विचारला जात आहे. कुशल तसेच अकुशल कामगारांची मागणी लॉकडाऊन संपल्यानंतर वाढेल. अर्थातच त्याची चणचण आहे. त्यांमुळे ते जास्त पगाराची अपेक्षा करतील. त्यांची मागणी कशी पूर्ण करायची. या दोन महिन्याच्या लॉकडाऊनमधून सावरण्यास किमान सहा ते सात महिने लागतील अशी तक्रार केली जात आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migration has led to a shortage of workers in the grocery stores; Read the news in detail