BIG NEWS : कोरोनावरील लस टोचून घेतलेल्या डॉक्टरला सौम्य दुष्परिणाम, ICU मध्ये उपचार सुरू

BIG NEWS : कोरोनावरील लस टोचून घेतलेल्या डॉक्टरला सौम्य दुष्परिणाम, ICU मध्ये उपचार सुरू

मुंबई, 19 : बहुप्रतिक्षित कोरोना लसीकरण मोहिमेनंतर दोन आरोग्य कर्मचार्‍यांना शनिवारी सीरम संस्थेने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचा डोस दिल्यानंतर सौम्य दुष्परिणाम दिसून आले आहेत. या दोघांनाही  चक्कर येणे, शरीरात वेदना आणि ताप सारख्या लक्षण दिसून आली. तथापि, डॉक्टरांनी स्पष्ट केले की ही लक्षणे लसीकरण केलेल्या व्यक्तींमध्ये सामान्य आहेत. दोघेही आता स्थिर असून सध्या निरीक्षणाखाली आहेत, त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल.

मुंबईतील व्ही.एन. देसाई रुग्णालयातील 51 वर्षीय डॉ. जयराज आचार्य यांना शनिवारी कोव्हिशील्ड लसीचा डोस घेतल्यानंतर चक्कर, अशक्तपणा, डिहायड्रेशन आणि ताप यासारख्या तक्रारींसाठी रविवारी अतिदक्षता विभागात (ICU ) दाखल केले गेले. दरम्यान, आता त्यांची प्रकृती स्थिर असून ताप कमी झाला असल्याचे व्हि.एन. देसाई रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांना 19 जानेवारी म्हणजेच आजच संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज दिला जाईल असे व्ही.एन.देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रभाकर मोरे यांनी सांगितले आहे.

तर, मुंबईच्या KEM  रुग्णालयातून आणखी एक अशी घटना समोर आली.  लसीकरणानंतर एका महिला आरोग्य सेविकेला ताप येऊन  सामान्य वॉर्डात दाखल केले गेले.

KEM  रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, पहिला डोस रोगप्रतिकारक प्रतिक्रियेला कारणीभूत ठरल्याने ताप आणि शरीरदुखीसारखी लक्षणे ही सामान्य आहेत. शिवाय, भीती आणि रिकामी पोट यामुळेही सौम्य दुष्परिणाम दिसुन आला असेल. शरीराची यंत्रणा त्यावर प्रतिक्रिया देतेय ही एक सकारात्मक बाब आहे. काहीजणांमध्ये लक्षणे दिसतात. तर, काहीजणांमध्ये नाही दिसत.

सोमवारी संध्याकाळपर्यंत एकूण 303 सौम्य दुष्परिणामांच्या घटना समोर आल्या. त्यापैकी 80 ग्रामीण पुणे, 11 पीएमसीचे आणि 203 पीसीएमसीमध्ये केसेस दिसल्या.  

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, “ आम्ही लसीकरण केलेल्या 1800 लोकांचा सतत शोध घेत आहोत आणि अगदी किरकोळ लक्षणे दर्शवणाऱ्या व्यक्तीला ही त्वरित आणि चांगली सेवा दिली जात आहे.

Mild side effects to the doctor after taking covishield vaccine made by serum 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com