मिलिंद बोरीकरांनी स्विकारले मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी पद

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 23 जुलै 2019

- मुंबई उपनगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी या पदाचा पदभार मिलिंद बोरीकर (भा.प्र.से) यांनी स्विकारला आहे.

- लोकाभिमूख प्रशासनावर त्यांचा भर असणार आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विनापरवानगी भेटीची वेळ ही दररोज दुपारी तान ते पाच अशी ठेवली आहे.

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी या पदाचा पदभार मिलिंद बोरीकर (भा.प्र.से) यांनी स्विकारला आहे. लोकाभिमूख प्रशासनावर त्यांचा भर असणार आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विनापरवानगी भेटीची वेळ ही दररोज दुपारी तान ते पाच अशी ठेवली आहे.

मिलिंद बोरीकर हे 2010 च्या बॅचचे आय.ए.एस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणुन तीन वर्ष काम पाहिले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद या पदावर काम करत असतांना त्यांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदु मानुन काम पाहिले आहे. पालघर या आदिवासी बहुल जिल्हयामध्ये शौचालय, शाळा, अंगणवाडी इमारत बांधकाम, पोषण आहार, कुपोषण निर्मुलन, पाणीपुरवठा यांसारख्या मुलभूत सोयी सुविधा निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milind Borkar to serve as collector at mumbai sub areas