
Mill Workers protest
ESakal
मुंबई : मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेले गिरणी कामगार हक्काच्या घरासाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत. घराच्या प्रश्नावर राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी अन्यथा तीव्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा आज १४ कामगार संघटनांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने दिला आहे. परळ येथील राष्ट्रीय मिल मजूर संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.