गिरणी कामगारांच्या घरांची प्रतीक्षा संपली! घरे उभारण्यासाठी साडेचार हेक्टर जागा, जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच जागेबाबत पत्र मिळणार

Mill Workers House: गिरणी कामगारांसाठी घरे उभारण्यासाठी कल्याणनजीक हेदुटणे येथील ४.७ हेक्टर शासकीय जमीन म्हाडाला दिली जाणार आहे.
Mill Workers House

Mill Workers House

ESakal

Updated on: 

मुंबई : गिरणी कामगारांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार म्हाडाच्या माध्यमातून मुंबईसह एमएमआर क्षेत्रात जागांचा शोध घेत आहे. त्यानुसार वांगणी, शेलूबरोबरच आता कल्याणनजीक असलेल्या हेदुटणे येथील तब्बल ४.७ हेक्टर शासकीय जमीन म्हाडाला मिळणार आहे. त्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच म्हाडाला सुपूर्द केले जाणार आहे. या जागेवर सुमारे ४,५०० घरे गिरणी कामगारांकरिता उभारणे शक्य होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com