आयफोनचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

आयफोन 10 चे प्रलोभन दाखवून विद्यार्थ्यांची एक लाख 6 हजारांची फसवणूक झाल्याची घटना घडली. याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई : आयफोन 10 चे प्रलोभन दाखवून विद्यार्थ्यांची एक लाख 6 हजारांची फसवणूक झाल्याची घटना घडली. याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार विद्यार्थी असून तो खार परिसरात राहतो. त्याला पाच आयफोन कमी किमतीत खरेदी करायचे होते. त्या दरम्यान तक्रारदाराची एकासोबत संकेतस्थळावरून ओळख झाली होती. ते दोघे व्हिडीओ कॉलवरून एकमेकांच्या संपर्कात होते.

आयफोनच्या खरेदीबाबत चर्चा झाल्यावर विद्यार्थ्याने 19 हजार एका व्यक्तीला पाठवले. पैसे पाठवल्यानंतर त्या व्यक्तीने इन्शुरन्स कव्हर नसल्याने ते सीमा शुल्क विभाग इस्लामाबाद येथे पकडल्याचे सांगितले. काही रक्कम पाठवल्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा तक्रारदाराशी संपर्क साधला. सीमा शुल्क विभागाने नोएडा येथे मोबाईल पकडले असून त्यासाठी 89 हजार भरावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने 89 हजार रुपयेही भरले. 89 हजार भरल्यानंतर डिलीव्हरचे शुल्क म्हणून 19 हजार आणखी भरावे लागतील, असे तक्रारदाराला सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तक्रारदाराने खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Millions of fraud by showing the iPhone