कोट्यवधी रुपये पाण्यात! चहूबाजूंनी रहिवाशी इमारती..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

पालिकेने शहरातील तलावांच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले; परंतु काही तलावांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे.

नवी मुंबई : पालिकेने शहरातील तलावांच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले; परंतु काही तलावांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. कोपरखैरणे सेक्‍टर १९ मधील तलावाची अशीच परिस्थिती झाली असून, त्यांचा पुनर्विकास करावा, अशी मागणी कोपरखैरणे मनसेचे शाखा अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांनी विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.  

ही बातमी वाचली का? मॉलमधील अनधिकृत दुकानांवर हातोडा

कोपरखैरणे सेक्‍टर १९ मधील जुना गणेश विसर्जन तलावावर गेल्या दोन महिन्यांपासून शेवाळाचा थर साचला आहे. या तलावाच्या चहूबाजूंनी रहिवाशी इमारती आहे. तलावातील अस्वच्छ पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांची पैदास वाढली असून, नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तलावाची स्वच्छता करावी, असे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजीव मेंढळे यांना तलावाची पाहणी करण्यासाठी नेण्यात आले. यावर तलावाची सफाई लवकरात लवकर करू, असे आश्‍वासन मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी वाचली का? हरवलेली चिमूकली परतली आई-वडिलांकडे 

पाच वर्षांपूर्वी १७ कोटी रुपये खर्च करून २१ तलावांचा पालिकेकडून तलाव व्हिजनअंतर्गत विकास करण्यात आला. मात्र, हा विकास फक्त काही काळापुरताच राहिला. यात केवळ काही अधिकारी, ठेकेदार व काही लोकप्रतिनिधींचाच विकास झाला. शहरातील तलावांची दयनीय अवस्था झाली आहे.
- संदीप गलगुडे, सामाजिक कार्यकर्ते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of rupees in water for beautification of lakes in Navi Mumbai!