हरवलेली चिमुकली परतली आई-वडिलांकडे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

माणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ जानेवारीला रात्री १२.३० वाजता आश्विनी मंगेश घाडगे (वय ११) ही अल्पवयीन मुलगी चुकून कळवा येथून माणगाव येथे रेल्वेने आली होती. रेल्वे पोलिसांनी माणगाव पोलिस ठाण्याला संपर्क करताच बीट मार्शल पोलिस कॉन्स्टेबल नाथा दहिफळे यांनी तिला घेऊन आले. 

माणगाव (वार्ताहर) : माणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ जानेवारीला रात्री १२.३० वाजता आश्विनी मंगेश घाडगे (वय ११) ही अल्पवयीन मुलगी चुकून कळवा येथून माणगाव येथे रेल्वेने आली होती. रेल्वे पोलिसांनी माणगाव पोलिस ठाण्याला संपर्क करताच बीट मार्शल पोलिस कॉन्स्टेबल नाथा दहिफळे यांनी तिला घेऊन आले. 

आश्विनी ही अल्पवयीन असल्याने तिला बडीकॉपमधील महिला पोलिस हवालदार दया पाटील यांनी स्वतःच्या घरी आणले. तिला स्वतःच्या मुलीचे कपडे देऊन खाऊपिऊ घातले. तिची मायेने विचारपूस करून माहिती घेतली. तिने दिलेल्या माहितीवरून, तिच्या शाळेची माहिती मिळाली. त्‍या आधारे कळवा पोलिस ठाण्याला संपर्क करून मुलीच्या आईवडिलांना कळवण्यास सांगितले. आपली मुलगी हरवली आहे हेदेखील त्यांना माहीत नव्हते.

प्रशासन म्‍हणजे जादूची कांडी नव्हे...का चिडले प्रशासन?

माणगाव पोलिसांनी अतिशय चौकसपणे तपासाची सूत्रे हलवली. तेथील बीट मार्शल यांनी मुलीच्या आईवडिलांना आश्विनी ही माणगाव पोलिस ठाण्यात असल्याची माहिती दिली. त्यावरून तिच्या आईवडिलांना माणगाव पोलिस ठाण्यात बोलावून घेतली. त्यानंतर मुलीला वडील मंगेश घाडगे (वय ३६) यांच्या ताब्यात दिले.

अबब... गुन्हा कराल तर घोडा लागेल पाठी... हे कसे काय?

माणगाव पोलिस ठाण्याचे बीट मार्शल व बडीकॉप कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांनी कौतुक केले. मुलीच्या पालकांनी माणगाव पोलिसांचे मनापासून आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Missing child came back to her home