राज्यात मिनी चित्रपटगृह उपक्रम राबवणार ः  अमित देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा पुढाकार

मुंबई : मराठीत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट येत आहेत. हे चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्यात 'मिनी चित्रपटगृह' (मिनी मिल्टिप्लेक्‍स) उभारण्यासारखे उपक्रम राबविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

मोठी बातमी अशोक चव्हाण म्हणतात बाळासाहेब थोरातांना हटवा, सोनिया गांधीकडे तक्रार?   

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज सांस्कृतिक कार्य मंत्री यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. महामंडळाकडून मेघराज राजे भोसले, वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे- विज, दिपाली सय्यद, अर्चना नेवरेकर, सुशांत शेलार, चैत्राली डोंगरे, विजय कोचीकर, पितांबर काळे, सतीश रणदिवे, रत्नकांत जगताप, दिलीप दळवी, महेश मोटकर यावेळी उपस्थित होते. 

महत्वाची बातमी नवी मुंबई काबीज करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, वाचा...

चित्रपट संमेलनासाठी आर्थिक मदत मिळावी, महामंडळासाठी राज्य शासनाकडून 5 कोटी रुपयांचा निधी, मराठी चित्रपटांना देण्यात येणारे अनुदान गुणांकन पध्दतीने न करता पुन्हा दर्जा पध्दतीने करण्यात यावे, कलाकारांना देण्यात येणारी पेन्शन आणि चित्रपटांना मिळणारे अनुदान ऑनलाईन पध्दतीने मिळावे, पडद्यामागील कलाकारांनाही सांस्कृतिक कार्य विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा, नाट्य- सिनेमा- वाचनालय असे "नाट्य- चित्र सांस्कृतिक संकुल' प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात यावे, मराठी सिनेमांना अधिकाधिक चित्रपटगृहे मिळावीत असे निवेदन महामंडळामार्फत सांस्कृतिक कार्य मंत्री यांना देण्यात आले. सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी या सर्व निवेदनाचा अभ्यास सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येईल, असे यावेळी महामंडळाच्या सदस्यांना सांगितले. 

Mini movie theater Will start by cultural department in the state


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mini movie theater Will start by cultural department in the state