esakal | उपनगरी रेल्वेला निम्माच प्रतिसाद; दहा दिवसात मिळून फक्त सहा लाख जणांचा प्रवास...
sakal

बोलून बातमी शोधा

उपनगरी रेल्वेला निम्माच प्रतिसाद; दहा दिवसात मिळून फक्त सहा लाख जणांचा प्रवास...

दहा दिवसातील एकंदरीत प्रवासी एका दिवसाच्या प्रवासी संख्येच्या दहा टक्केही नाहीत. रोज सव्वा लाख प्रवासी असतील असा अंदाज असताना सरासरी 60 हजारच प्रवास करीत आहेत. 

उपनगरी रेल्वेला निम्माच प्रतिसाद; दहा दिवसात मिळून फक्त सहा लाख जणांचा प्रवास...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना महामारीमुळे मुंबईची लाईफलाईन कोलमडली आहे. एका दिवसात 78 लाख प्रवासी वाहतूक उपनगरी रेल्वे करीत असे, पण आता मर्यादीत स्वरुपात उपनगरी रेल्वे खुली झाली, पण दहा दिवसातील एकंदरीत प्रवासी एका दिवसाच्या प्रवासी संख्येच्या दहा टक्केही नाहीत. रोज सव्वा लाख प्रवासी असतील असा अंदाज असताना सरासरी 60 हजारच प्रवास करीत आहेत. 

पुनश्च हरीओम होण्यासाठी तसेच अत्यावश्यक प्रवासाचा प्रवास सुखकर करण्यासाठी मर्यादीत स्वरुपात उपनगरी सेवा सुरु झाली, पण दहा दिवसात मिळून एकत्रित सहा लाख प्रवासांनीच प्रवास केले असल्याचे जाहीर झाले. उपनगरी रेल्वेच्या 362 फेऱ्या 15 ते 23 जून या दहा दिवसात चालवण्यात आल्या. अर्थात रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीत या सेवेचा उपयोग घेत असलेल्या रेल्वेतील कर्मचाऱ्यांचा समावेश नसेल हा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

सावधान ! कोरोनासह देशात मधुमेह बळावतोय; एकट्या महाराष्ट्रातील मधुमेही रुग्णांची संख्या वाचून धडकी भरेल

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच उपनगरी रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सेवा सुरु झाली, त्यावेळी सव्वा लाख प्रवासी रोज असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र हा आकडा अजून खूप दूर आहे. दहा दिवसात सहा लाख 16 हजार 993 प्रवाशांनी प्रवास केला. याचा अर्थ रोज सरासरी 62 हजार जण प्रवास करतात. 
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी सेवा सुरु झाल्यावर रेल्वेने काही स्टेशनवर तिकीट विक्री सुरु केली. तिकीट विक्री करणारे कर्मचारी एका दिवसाआड कामावर येत आहेत.  उपनगरी सेवेवरील तिकीट विक्रीतून 1 कोटी 90 लाख 76 हजार रुपयाची कमाई केली आहे. 

आता पश्चिम रेल्वेपेक्षा मध्य रेल्वेवरील तिकीट प्रवासी कमी असले तरी मध्य रेल्वेच्या तिकीट विक्रीतून जास्त उत्पन्न मिळाले आहे. पश्चिम रेल्वेवर 4 लख 47 हजार 127 प्रवाशांनी तर मध्य रेल्वेवर 1 लाख 69 हजार 866 प्रवाशांनी प्रवास केला. पश्चिम रेल्वेने 85 हजार 242 तिकीटांची विक्री करुन 60 लाख 10 हजार रुपयांची कमाई केली, तर मध्य रेल्वेने 1 53 हजार 382 तिकीट विक्रीतून 1 कोटी 30 लाख 66 हजार रुपयांची कमाई केली.

loading image