मुंबई : एमएमआरडीएसह मेट्रोच्या सर्व प्राधिकरणांनी आपापसात समन्वय ठेवावा तसेच गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा पावसाळी आराखडा तयार करावा, एखाद्या स्थानकात गर्दी झाली, तर काय करावे याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी आज दिले. त्याचबरोबर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेशी समन्वय ठेवून काम करावे, असेही त्यांनी एमएमआरडीएसह मेट्रोच्या सर्व प्राधिकरणांना बजावले आहे.