मंत्री आस्थापनेवरील अधिकाऱ्यांची छाननी होणार

सिद्धेश्‍वर डुकरे - सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

मुंबई - अलीकडेच झालेल्या विस्तारात नव्या मंत्र्यांच्या कार्यालयातील प्रत्येक अधिकाऱ्याची छानणी करूनच त्यांना मंत्री आस्थापनेवर घेतले जाणार आहे. हे धोरण मुख्यमंत्री कटाक्षाने पाळणार असून, यासाठी सामान्य प्रशासन विभाग या अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल तपासूनच मंत्र्यांकडे काम करण्यास हिरवा कंदील देणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या धोरणामुळे नव्या मंत्र्यांना मर्जीनुसार अधिकारी घेण्यास मज्जाव होणार आहे. परदेशात जाण्यापूर्वी त्यांनी नव्या मंत्र्यांना "अधिकाऱ्यांचे बायोडाटा घेऊन ठेवा आणि मग विचार करू‘, असे सांगितले आहे. 

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संबंधित मंत्र्यांच्या आस्थापनेवर काम करण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची लगबग सुरू असते. ज्या मंत्र्याकडे महत्त्वाची खाती असतात त्या मंत्र्यांकडे काम करण्यास मिळावे, यासाठी हे अधिकारी अनेक मार्गाने लॉबिंग करीत असतात. त्यातच खासगी सचिव (पीएस) म्हणून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी हे अधिकारी "देव‘ पाण्यात घालून बसलेले असतात. त्यासाठी कधी नातेवाईक म्हणून शिफारस; तर त्या मंत्र्यांच्या जातसमूहातील म्हणून लॉबिंग केले जाते. त्यामुळे शेवटी मंत्र्यांनाही अशा अधिकाऱ्यांना नाईलाजाने घ्यावे लागते. मात्र हे अधिकारी योग्य विचार करून नाही घेतले, तर मंत्री अडचणीत येण्याची शक्‍यता असते. त्यामुळे लायक अधिकारी घेणे फारचे महत्त्वाचे आहे. हे गृहीत धरून फडणवीस यांनी खासगी सचिव, स्वीस सहायक, विशेष कार्यकारी अधिकारी यांची कामगिरी पाहूनच मंत्री आस्थापनेवर घेण्याविषयी नूतन मंत्र्यांना बजावले आहे. मंत्री आस्थापनेवरील सध्या सामान्य प्रशासन विभागाने निश्‍चित केली असून, कॅबिनेट मंत्र्यांसाठी एक खासगी सचिव, तीन स्वीय सहायक, एक खासगी स्वीय सहायक (बाहेरील), राज्यमंत्र्यांसाठी एक खासगी सचिव, दोन स्वीय सहायक, एक खासगी स्वीय सहायक (बाहेरील) अशी पदसरंचना आहे. मात्र कॅबिनेट व राज्यमंत्री यांना विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) यांची संख्या निश्‍चित नाही. 

चहापेक्षा किटली गरम नको 

मंत्री आस्थापनेवर घेतलेले अधिकारी नंतर निर्जिव होतात. जणू आपणच मंत्री आहोत, या थाटात वावरतात आणि आदेश देत असतात. अशा अधिकाऱ्यांमुळे अनेक मंत्री अडचणीत येत असल्याने "नाकापेक्षा मोती जड‘ याप्रमाणे मंत्र्यापेक्षा त्याच्या मंत्री आस्थापनेवरील एखादा अधिकारी डोईजड होतो. त्यामुळे "चहापेक्षा किटली गरम‘ ही परिस्थीती निर्माण होणार नाही, याची दक्षता मुख्यमंत्री या नव्या मंत्र्यांबाबतीत घेणार आहेत.

Web Title: Minister establishment officials will scrutinize