वाशी: खंडणीच्या गुन्हातील फरार आरोपीच्या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्र्याची हजेरी

Jitendra Awhad
Jitendra Awhadsakal media
Updated on

वाशी : राष्ट्रवादी कॉँग्रेसचा नवी मुंबई (Navi Mumbai) युवक जिल्हाध्यक्ष किशोर उर्फ अन्नू आंग्रे व त्यांचे बंधू राहुल आंग्रेसह सहा आरोपींवर रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police station) नोव्हेंबर महिन्यात खंडणीचा गुन्हा (extortion case) दाखल केला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. रविवारी अन्नू आंग्रे (Annu angre) यांनी आयोजित केलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी हजेरी लावल्‍याने परिसरात चर्चांना उधाण आले.

Jitendra Awhad
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा कधी ?

गृहनिर्माण मंत्री येणार असल्याने दिघा विभागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तरी पोलिसांना फरारी आरोपी कसा दिसला नाही, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे. पोलिसांनीही आरोपी फरारी असल्याचे घटनेला दुजोरा दिला आहे. आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात येत नसल्यामुळे तक्रारदाराने उच्च न्यायलयात याचिका देखील केली आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अन्नू आंग्रे याला उभे राहण्याचे डोहाळे लागले आहेत, तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनादेखील नवी मुंबईत आपले प्रस्थ निर्माण करायचे असल्याने त्यांनी आंग्रेला हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ त्याच्या गळ्यात घातली आहे. आव्हाड यांच्या माध्यमातून नवी मुंबईत अन्नू आंग्रे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका बघता राजकीय मोर्चेबांधणीला आंग्रे यांनी सुरुवात केली आहे. राज्‍याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी अन्नू आंग्रेच्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात हजेरी लावली. इतकेच नव्हे तर यावेळी आंग्रेवर आव्हाड यांनी भाषणात स्तुतिसुमनेही उधळली.

नवी मुंबईसह ठाण्यातही गुन्हे दाखल

नवी मुंबईसह ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये अन्नू आंग्रेवर खून, खुनांचा प्रयत्न, अपहरण, खंडणी यांसह अन्य गुन्हे दाखल आहेत. राजकीय वरदहस्तामुळे त्‍याला अभय मिळते आहे, तर या आधी झालेल्या जाहीर कार्यक्रमांमध्येही आव्हाड यांनी आंग्रेच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. रविवारी झालेल्या कार्यक्रमात आपल्याला हिंसा नको, अहिंसा हवी म्हणून अन्नू आंग्रे याला चांगल्या मार्गावर घेऊन येत असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात अन्नू आंग्रे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com