
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमान्यांसाठी दिलासादायक ठरणारी परंपरा याही वर्षी कायम राहणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे ‘मोदी एक्स्प्रेस’ गणपती स्पेशल रेल्वेसेवा यंदा डबल धमाक्यात सज्ज होणार आहे. केवळ एक नव्हे, तर तब्बल दोन मोफत विशेष गाड्या कोकणवासीयांसाठी धावणार असल्याची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली.