esakal | मुंबई लोकलबाबत वडेट्टीवारांचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

विजय वडेट्टीवार

मुंबई लोकलबाबत वडेट्टीवारांचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : मुंबई लेव्हल तीनमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. पुन्हा अधिक परिस्थिती बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. ज्या लेव्हलमध्ये सवलत देण्यात आली आहे, त्या लेव्हलमध्ये मुंबई (mumbai local train) आली की की लोकल नक्की सुरू होईल. तीनवर असताना काहीच करता येत नाही. आहे त्या नियमावलीतच त्यांना सवलती द्यावी लागेल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (minister vijay wadettiwar) म्हणाले. (minister vijay wadettiwar statement on mumbai local trains starts)

हेही वाचा: लिव्ह इन रिलेशनशिप याचिका कोर्टाचा वेळ घेतात - उच्च न्यायालय

आजही दहा हजाराच्या आसपास नवीन रुग्ण आहेत. कोरोना संपलेला नाही. रुग्ण बरी होण्याची संख्या सात हजाराच्या जवळपास आहे. रुग्णसंख्या बरी होण्याचा दर वाढला होता. पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला होता. आता त्याच्या उलट झालेले आहे. रुग्णसंख्या वाढत असून बरी होण्याचा दर कमी झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. एकूण परिस्थितीचा अभ्यास करून निर्बंध वाढवावे किंवा कमी करावे, याबाबत तेथील स्थानिक प्रशासनावर जबाबदार सोपविली आहे. मात्र, रुग्ण वाढले तरी जबाबदारी त्यांचीच असेल. जिल्ह्याची परिस्थिती बदलायची असेल तर लोकांनी सहकार्य करावे. मास्क घाला,सोशल डिस्टनसींगचे पालन करावे, असेही ते म्हणाले.

दोन्ही राजे एकत्र येणे आनंदच आहे. कुठल्या समाजाच्या प्रश्नासाठी राजे एकत्र येऊन भूमिका घेतली तर ते चांगलंच. मराठा समाजाबरोबरच त्यांनी ओबीसीसाठी आम्हाला मदत करावी. राजे हे जनतेचे असतात. हक्कासाठी आंदोलन करणे गैर नाही. ओबीसी आरक्षणासाठी आयोगाची स्थापन झाली. त्याचा गॅजेट प्रसिद्ध व्हायचा आहे, ते एक-दोन दिवसांत होईल. ओबीसी समाजाचे प्रश्न घेऊन समाजात चर्चा करणार आहोत, असेही वडेट्टीवार म्हणाले.

loading image