चाकूचा धाक दाखवून दोन अल्पवयीन मुलांनी तरूणाला लुटलं

कल्याण आणि डोंबिवली स्टेशन्सदरम्यान भरदिवसा घडली भयंकर घटना
knife attack.jpg
knife attack.jpg
Updated on
  • कल्याण आणि डोंबिवली स्टेशन्सदरम्यान भरदिवसा घडली भयंकर घटना

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कल्याण (Kalyan) हे शहर चर्चेत आहे. काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झालाय. त्या व्हिडीओमध्ये एक वृद्ध माणूस (Old Man) आपल्या पत्नीला (Wife) लाथाबुक्क्यांनी (Beating) तुडवताना दिसत होता. इतकंच नव्हे तर आपल्या हातातील प्लॅस्टिकच्या बादलीने (Bucket) तो तिला मारहाणही करत होता. घडलेला प्रकार पोलिसांपर्यंत (Police) पोहोचला आणि त्यानंतर त्या मारहाण करणाऱ्या चिकणकर बुवांवर (Chikanakar Buva) अखेर गुन्हा दाखल झाला. ही गोष्ट कल्याणजवळच्या एका खेड्यात घडली. याविषयीच्या चर्चा शांत होण्याआधीच कल्याण पुन्हा चर्चेत आलं. दोन अल्पवयीन (Minors) मुलांनी एका तरूणाला चाकूचा (Knife Point) धाक दाखवून लुटल्याची (Robbed) धक्कादायक घटना घडली. (Minor Boys robbed young man at knife point in local train between Kalyan and Dombivli)

knife attack.jpg
"ही प्रथा योग्य नाही"; देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत

लोकल रेल्वे प्रवासाची अद्याप साऱ्यांनाच परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी खूपच कमी असते. अशा वेळी काही लोक याचा गैरफायदा घेतात आणि लूटमार करतात. असाच एक प्रकार कल्याण आणि डोंबिवली स्टेशनदरम्यान घडला. एक २४ वर्षीय तरूण लोकल ट्रेनने प्रवास करत होता. मुरलीप्रसाद यादव असं या तरूणाचं नाव असून तो नवी मुंबईचा रहिवासी आहे. तो कल्याण ते ठाणे रोज प्रवास करतो. रविवारच्या दिवशी तो प्रवास करत असताना कल्याण आणि डोंबिवली या दोन स्थानकांदरम्यान संध्याकाळच्या वेळी त्याला लुटण्यात आलं.

knife attack.jpg
"चोरीचा माल विकत घेणाराही..."; राऊत चंद्रकांतदादांवर बरसले

मुरलीप्रसाद हा लगेजच्या (Luggage) डब्ब्यातून प्रवास करत होता. त्यावेळी तो डोंबिवलीहून कल्याणला जात होता. तो डब्ब्यात चढला तेव्हा तेथे आधीच दोन जण डब्ब्यात होती. ठाकूरली स्टेशनला ट्रेन पोहोचत असताना त्या दोन अल्पवयीने मुलांनी थेट चाकू काढला आणि त्याला आपला मोबाईल द्यायला सांगितला. चाकूच्या धाकावर त्याचा मोबाईल लुटून हे दोघे पसार झाले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दोन अज्ञात मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

knife attack.jpg
Video: धावती ट्रेन पकडण्यासाठी तरूणाने मारली उडी अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com