Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

Man dies who injured in suv crash : मुंबईत १७ वर्षीय मुलाने एसयूव्ही कार भरधाव वेगात चालवत दुचाकीला धडक दिली होती. या अपघाता पती-पत्नी गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Husband Dies 10 Days After Mumbai SUV Crash by Minor

Husband Dies 10 Days After Mumbai SUV Crash by Minor

Esakal

Updated on

मुंबईतील विद्याविहार इथं १० दिवसांपूर्वी भरधाव एसयुव्ही कारने दुचाकीला धडक दिल्यानं अपघात झाला होता. यात पती पत्नी गंभीर जखमी होते. यापैकी पतीची १० दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरलीय. ३३ वर्षीय ध्रुमील पटेल यांचा उपचारावेळी मृत्यू झालाय. तर पत्नीवर अजूनही उपचार सुरू आहेत. दुचाकीला धडक देणारी एसयुव्ही कार एक १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com