शर्मिला वाळुंज
डोंबिवली : मामाच्या मुलासोबत प्रेम असून त्याच्यासोबतच लग्न करायच आहे असा हट्ट धरला. मात्र मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता. या नाराजीतून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी खांबाळपाडा परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांकडून टिळकनगर पोलीसांनी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.