मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

minor girl molestation

मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जवळच्याच नातेवाईकानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (minor girl molestation) केल्याची घटना आटकोपर येथे घडली. लैंगिक अत्याचारांच्या अनेक घटनांप्रमाणे (sexual assault cases) याही घटनेत आरोपी हा जवळचा नातेवाईकच आहे. यात फिर्यादी आई आणि घरातील इतर व्यक्ती ह्या बाहेर जाणार होत्या, त्यामुळं त्याच्या दोन मुलींना सोबत म्हणून त्यांनी जवळचा नातेवाईक असलेल्या आरोपीला घरी बोलावले होते. त्यानंतर आरोपीनं पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी (Ghatkopar police) आरोपीला अटक (culprit arrested) केली आहे.

हेही वाचा: डोंबिवली : मानपाडा पोलिसांवर हल्ला; झारखंडमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या

आरोपीनं पीडित मुलीला घरात कुणाला सांगु नकोस अंसंही बजावलं, मुलीनं आधी घरातल्यांना काही सांगितलं नाही, पण नंतर तिच्या पोटात दुखायला लागल्यानं तिनं आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने तिला घेऊन घाटकोपर पोलीस स्टेशनला आली, तिथं असलेल्या निर्भया पथकातील पोलीस उपनिरिक्षक शितल जाधव आणि पोलीस उपनिरिक्षक रुपाली पाटील यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून सविस्तर माहीती घेतली.

मुलीची आई तक्रार करायला तयार होत नव्हती, या दोन महिला अधिकाऱ्यांनी आईला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाबाबत सांगून तक्रार करणं किती महत्वाचं आहे हे पटवून दिलं त्यानंतर मुलीच्या आईनं त्या नातेवाईकाच्या विरोधात तक्रार केली. आरोपीला घाटकोपर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीवर भा द वि च्या कलम 376, 376 (2) (फ) (आय) (जेे), 377 तसंच पोक्सो कायदा कलम 4,6,8,10, आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

loading image
go to top