

Navi Mumbai Crime
ESakal
नवी मुंबई : शिक्षणाचे स्वप्न दाखवून नवी मुंबईत आणलेल्या अल्पवयीन मुलीला तिच्या सख्ख्या आत्याने लेडीज बारमध्ये काम करण्यास भाग पाडले. तसेच तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेने आत्याच्या तावडीतून सुटुन आपले मूळ गाव गाठले; मात्र तिच्या जन्मदात्या बापानेही तिला विकण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बालकल्याण समितीच्या आदेशानंतर तुर्भे पोलिस ठाण्यात पीडितेचे वडील व आत्यासह चौघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.