मिरा-भाईंदर, वसई- विरार पोलिस अव्वल

गुन्हा सिद्ध करण्यात राज्यात प्रथम
Police
PoliceSakal

वसई - घडलेले गुन्हे अत्यंत बारकाईने तपासून, न्यायालयात सबळ पुरावे सादर करून आरोपींना शिक्षा करण्यात मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय महाराष्ट्रात प्रथम आले आहे; तर अमरावतीला दुसरा क्रमांक मिळाला आहे. यात ठाणे चौथ्या; तर मुंबई पाचव्या क्रमांकावर आहे. राज्य पोलिस महासंचालकांनी गुन्हा सिद्ध करणाऱ्या पोलिस आयुक्तालयाची वर्गवारी केली आहे. त्यानुसार मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे.

वसई मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यावर आयुक्त सदानंद दाते यांनी जबाबदारी सांभाळली, तेव्हापासून गुन्हेगारांवर अंकुश मिळविण्यासाठी पोलिस विभागात नवनवीन प्रयोग करण्यात येत आहे. या प्रयोगांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. शहरात अमली पदार्थ, दारू, खून, दरोडे, घरफोडी, लूटमार, खंडणी, बलात्कार, अत्याचार, मारहाण यासह अनेक गुन्हे घडतात. मात्र, अनेकदा पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध होत नाही व आरोपी मोकाट सुटतात. त्यामुळे मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाण्यांकडून गुन्ह्याची उकल करण्यासोबतच याविषयी पुरावे न्यायालयात सादर करताना योग्य ती खबरदारी घेण्यात येते.

आयुक्तालयाच्या हद्दीत होणारे गुन्हे त्या त्या पोलिस ठाण्यातील तपास अधिकारी हाताळत असतात. त्यांना प्रथम गुन्ह्यातील व्यक्तीने गुन्हा कसा केला, त्यासंदर्भात पुरावे एकत्रित करण्यासाठी काम करावे लागते. साक्षीदारांसमक्ष पंचनामे करणे याकडे लक्ष केंद्रित केले जाते. पोलिसांनी ही जबाबदारी चोख पार पाडली आहे.

सीसीटीव्ही ठरतोय फायदेशीर

शहरातील अनेक भागात गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे तपासकामी गुन्हा कसा घडला, यापासून ते आरोपीपर्यंत पोहचण्यास पोलिसांना मोलाची मदत होत आहे व तपासाला गती मिळत असल्याने तिसऱ्या डोळ्याची नजर फायदेशीर ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com