

Mira-Bhayandar Bridge Controversy video Viral
ESakal
मुंबई : मुंबई मिरा-भाईंदर येथे एमएमआरडीएने १०० कोटींचा चार लेन डबल डेकर पूल उभारला आहे. या पुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी या उड्डाणपुलाच्या बांधकामाला ट्रोल केले जात आहे. व्हायरल व्हिडिओनुसार एमएमआरडीएने वाहतुकीसाठी तयार केलेला हा चार पदरी पूल पुढे जाऊन दोन पदरी होत आहे. यामुळे नेटकरी या पुलाला ट्रोल करत असून मनसेनेही या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली आहे.